मनोगत

 आपणासमोर जि.प.प्राथमिक शाळा,तामशिदवाडी हा ब्लॉग सादर करीत असताना अतिशय आनंद होत आहे.हा ब्लॉग मी केवळ मा.श्री.संतोष भोंबळे सर (Teach Savvy Teachers)Group Admin यांच्यामुळेच बनवू शकलो.त्यांचा मी खूप खूप आभारी आहे.
       या ग्रुपमधील मा.शिक्षण सचिव श्री नंदकुमार साहेब,मा.शिक्षण आयुक्त श्री.भापकर साहेब,मा.श्री भाऊसाहेब चासकर सर यांच्या सतत मिळणाऱ्या प्रेरणेमुळे तसेच श्री. सुनील आलुरकर सर ,श्री. बालाजी जाधव सर ,श्री.राम सालगुडे सर,श्री.लक्ष्मण वाठोरे सर,श्री सोमनाथ वाळके सर या तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.
           या ग्रुपच्या माध्यमातून मी पेपरलेस कार्यालय ही संकल्पना मांडत होतो.ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीत होतो. त्याचाच एक भाग म्हणून मी हा ब्लॉग तयार केला.
           मी माझ्या अल्प ज्ञानातून माळशिरस तालुक्यासाठी एक ब्लॉग १५ जून पूर्वी तयार करणार आहे.त्याचा उपयोग तालुक्यातील सर्व शिक्षक,केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी या सर्वाना होईल अशी अपेक्षा आहे.
    पुन्हा एकदा Teach Savvy Teachers ग्रुप चे आभार.
                          राजेंद्रकुमार साधु बोराटे (उप-शिक्षक)
                            जि.प.प्राथ.शाळा,तामशिदवाडी

                            ता.-माळशिरस जि.-सोलापूर  

No comments:

Post a Comment