2 May 2016

उन्हाळी सुट्टी 
दिनांक ०९ मे ते १५ जून अखेर पर्यंत सोलापूर जि.प.शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे.

22 July 2015

SEARCH U - DISE CODE

सरल प्रणालीत माहिती भरण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचे U- DISE  कोड  पाहण्यासाठी
येथे  CLICK करा.

20 June 2015

शाळा प्रवेशोत्सव

   आज दिनांक १५/०६/२०१५ रोजी जि.प.प्राथमिक शाळा तामशिदवाडी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भानुदास नरुटे व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री विठ्ठल पाटील यांच्या हस्ते इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या मुलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
     यावेळी पुस्तके वाटपाचा कार्यक्रम वरील दोन्ही मान्यवर ,शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर तसेच श्री बोराटे सर आणि गोरे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

25 May 2015

बारावीचा निकाल २७ मे रोजी

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी २७ मे  रोजी जाहीर करण्यात येणार आहे.त्यामुळे विद्यार्थी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.मार्च मध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती.
     बारावीचा निकाल २७ मी रोजी लागणार अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.विद्यार्थ्यांना निकाल mahresult.nic.in या साईटवर पाहता येणार आहेत.