24 April 2015

              विविध पदोन्नतीसाठी कागदपत्रे पडताळणी आज
                             सोलापूर जिल्ह्यातील विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक या पदाच्या पदोन्नतीसाठी आज जिल्हा परिषद सोलापूर याठिकाणी १९९२ पर्यंत नेमणूक तारीख असलेल्या शिक्षकांना मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी बोलाविण्यात आले आहे.

22 April 2015

संघटनेच्या प्रयत्नाला यश


     आज दुपारी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्या समवेत सोलापूर जि.प.चे शिक्षण अधिकारी श्री.बाबर साहेब यांची सहविचार सभा झाली. या सहविचार सभेत उन्हाळ्याच्या सुट्टी बाबत चर्चा करण्यात आली. त्यावर श्री .बाबर साहेबांनी दोन दिवसात निर्णय घेतो असे सांगितले.
    परंतु प्रत्येक शिक्षकांनी एका विद्यार्थ्यास आपल्या शाळेत दाखल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक पदोन्नती प्रश्न मार्गी लावण्याचेही आश्वासन यावेळी श्री बाबर साहेबांनी संघटनेच्या पदाधिकार्यांना दिले.